Talegaon Dhabhade: मालकाच्या परस्पर जमिनीचे खरेदीखत

एमपीसी न्यूज – जमीन मालकाच्या परस्पर जमिनीचे खरेदीखत (Talegaon Dhabhade)दस्त करून मालकाची फसवणूक केली. हा प्रकार 26 जून 2015 ते 2 जून 2016 या कालावधीत दुय्यम निबंधक श्रेणी एक, मावळ दोन तळेगाव दाभाडे या कार्यालयात घडला.

भीमराव विष्णू वाघमारे, नामदेव विष्णू वाघमारे, उमाजी उर्फ (Talegaon Dhabhade)उमेश विष्णू वाघमारे, बबाबाई नाना आगळे (सर्व रा. डोणे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र राघू गंगावणे (वय 50, रा. चिखली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

HSC Exam : 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी 3 हजार 320 केंद्रांवर देणार बारावीची परीक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोणे गावातील गट क्रमांक 153 येथील 28 गुंठे जमीन मालक दत्तू साळुंके, दिलीप साळुंके यांच्या मालकीची आहे. हे माहिती असताना आरोपींनी त्या जमिनीचे सहा लाख 40 हजार रुपये घेऊन दुय्यम निबंधक श्रेणी एक, मावळ दोन, तळेगाव दाभाडे या कार्यालयात खरेदीखत दस्त बनवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.