Journey of songs : ‘गीतों का सफर’ कार्यक्रमाला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड मिळवलेले जितेंद्र भुरुक यांचा ‘गीतों का सफर’ (Journey of songs) हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला तळेगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना साथीमुळे थांबलेले जनजीवन पुन्हा सुरळीत होत असताना अशा कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे नागरिकांसाठी सुरेल मेजवानी ठरली आहे, अशा भावना तळेगावकरांनी व्यक्त केल्या.

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी, मोहम्मद रफी फॅन क्लब, साक्षी डायग्नोस्टिक सेंटर व अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने  “वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड ” मिळालेले जितेंद्र भुरुक  यांचा ” गितो का सफर ” हा गाण्यांचा कार्यक्रम 7 मे रोजी लायन्स क्लब, कडोलकर कॉलनी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी 1200 श्रोते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुका  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  गणेश खांडगे, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, अध्यक्ष राजेश गाडे पाटील, उपाध्यक्ष दिपक फल्ले, साक्षी डायग्नोस्टिक सेंटरचे डायरेक्टर सौ किरण किल्लावाला व श्री बिजेंद्र किल्लावाला, तसेच मोहम्मद रफी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत काळोखे अध्यक्ष नितीन खळदे, राजेंद्र जगताप, सतीश देशपांडे व  सर्व सदस्य, तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्य संतोष शेळके,संजय मेहता, दिलीप पारेख, सुरेश शेंडे,सुरेश दाभाडे बाळासाहेब रिकामे, प्रदिप टेकवडे, अविनाश नागरे, हरिश्चंद्र गडसिंग, वैशाली खळदे ,अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व त्यांचे सहकारी, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष शैलेजा काळोखे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, नितिन फाकटकर व व्याख्याते विवेक गुरव आदी मोठ्या (Journey of songs) संख्येने मान्यवर उपस्थित होते.

जितेंद्र भुरुक व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप छान बहारदार गाण्यांचा (Journey of songs) कार्यक्रम येथे संपन्न केला, त्यामध्ये सादर केलेल्या मराठी व हिंदी गाण्यामुळे सर्व जनसमुदाय  भारावून गेला व सर्वांनी या गाण्यांचा आनंद घेतला. दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये जगाचे आर्थिक चक्र थांबले होते, त्यामध्ये अनेक वित्त हानी व मनुष्य हानी झाली होती, या दुःखातून व संकटातून सावरण्यासाठी, आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी गायन व संगीत  हे औषधा सारखे संजीवनी देऊन बरेच काही देऊन जाते आणि या सर्व आयोजकांमुळेच अशा कार्यक्रमाचा आनंद सर्वाना मिळाला.

अश्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाला सर्व तळेगाव रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विलास काळोखे, सुरेश धोत्रे व अनिल धर्माधिकारी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन फाकटकर यांनी केले व आभार दिपक फल्ले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.