Pune News : भिडे पूलाजवळून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज : सेल्फी काढण्याच्या नादात पुण्यातील जवळून पाय घसरल्याने वाहून गेलेल्या त्यातून अनेक तरुणांचे मृतदेह सापडले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हे तरुण वाहून गेले होते. यातील एकाचा मृतदेह नाना-नानी घाटाजवळ तर दुसऱ्याचा मृतदेह संगम ब्रिज जवळ सापडला आहे. ओम तुमप्पा तुपधर (वय 18) आणि सौरभ सुरेश कांबळे (वय 20) या दोघांची नावे आहेत.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. सौरभ, ओम आणि त्याचे दोन मित्र भिडे पुलाजवळ असणाऱ्या नदीपात्रात जाऊन सेल्फी काढत होते. यावेळी यातील एक जण पाय घसरल्याने वाहून जावू लागला. त्याला वाचवण्यासाठी सौरभ कांबळे गेला असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. त्यानंतर अग्निशमन दल व एनडीआरएफ च्या जवानांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

रविवारी सकाळी नाना नानी पार्क जवळील घाटात सौरभचा तर संगम ब्रिज जवळील नदीपात्रात ओमचा मृतदेह सापडला आहे. दोन्ही मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.