Nigdi Crime News : प्राधिकरणातील शंकराच्या मंदिरावरील कळस चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील शंकराच्या मंदिरावरील कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे.

सचिन बाबुराव बनसोडे (वय 42, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथील शंकराच्या मंदिरावर चार पितळी कळस होते. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. 9) रात्री दहा ते गुरुवारी (दि. 10) सकाळ आठ वाजताच्या कालावधीत मंदिरावरील चार पितळी कळस आणि दक्षिणा पेटीतील रोख रक्कम असा एकूण पाच हजारांचा ऐवज चोरून नेला.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चोरटे मंदिराच्या पाठीमागील लोखंडी कंपाउंडची जाळी उचकटून मंदिरात आले असल्याचे पाहणीत उघडकीस आले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.