Alandi : एमआयटी महाविद्यालयातील गणित विभागाचे दोन दिवसीय मॅथलेटिक्स: पॉवर युवर ब्रेन या शीर्षका खाली विविध स्पर्धाचे आयोजन

एमपीसी न्यूज – माईर्स एमआयटी कला, वाणिज्य (Alandi) आणि विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागाने दोन दिवसीय मॅथलेटिक्स: पॉवर युवर ब्रेन या शीर्षका खाली आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धामध्ये पिंपरी-चिंचवड आणि पुणे विभागातील 20 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Pimpri : जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड बंद

सेंट मीरा कॉलेज, नवरोसजी वाडिया कॉलेज,डी.वाय.पाटील कॉलेज,प्रतिभा कॉलेज,एस.पी.कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,तेलंग सीनियर कॉलेज,एमआयटी एओई,  एआयटी कॉलेज, श्री सिद्धिविनायक कॉलेज,एमआयटी ज्युनियर कॉलेज.मॉडर्न कॉलेज, 402 स्पर्धकांनी नोंदणी केली आणि 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन, पीपीटी, मॉडेल मेकिंग, सुडोकू, बुद्धिबळ, मॅथ्स कोडींग, पेपर फोल्ड, मिनिट टू मिनिट, ओपन माइक, लुडो आणि स्कॅव्हेंजर हंट या स्पर्धामध्ये आपले कौशल्य दाखवून या दोन दिवसीत गणितीज्ञान सर्व शास्त्रांमध्ये का गरजेचे आहे याची माहिती मिळवली .विद्यार्थ्यांकडून काही उत्तम व्यावसायिक व तांत्रिक गोष्टींन मध्ये गणिताचा वापर कसा कसा करावा आणि त्या माध्यमातून रोजच्या जीवनातील गोष्टी कशा सुलभ कराव्या याचेही सादरीकरणे करण्यात आले .

स्पर्धक विजेते आणि उपविजेत्यासाठी ट्रॉफीसह रोख बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. ही दोन दिवसीय स्पर्धाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे: प्रा. मसलकर सहाय्यक प्राध्यापक आबासाहेब गरवारे महाविद्यालय, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे , उपप्राचार्या प्रा.अक्षदा कुलकर्णी , डॉ. मानसी अतितकर यांनी केले.

प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे व विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय मॅथलेटिक्स सप्ताह 2023 यशस्वीरित्या पार पडला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा. संजय गुंजाळ , प्रा.तृप्ती निगडीकर ,प्रा. विजयलक्ष्मी कोठेवाल प्रा. सुषमा चाळके, प्रा वसंत करमाड, डॉ राहुल खलाटे, प्रा मंजुळा चौधरी यांनी केले. विध्यार्थी प्रतिनिधी हेमंत व सुर्वेश मांडे यानी सर्व स्पर्धे मध्ये विद्यार्थी समन्वयकचे काम केले . उद्घाटन सोहळ्यासाठी, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक, विद्यार्थी समन्वयक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.