Chinchwad Crime News : शहर परिसरातून महागड्या सायकलसह पाच दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहे. शहर परिसरातून पाच दुचाकी वाहने आणि एक महागडी सायकल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रविवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई एल 8854) विवेकनगर आकुर्डी येथे पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

गणेश वसंत मानुरे (वय 24, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 45 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच एस 3344) अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंग मधून चोरून नेली.

लक्ष्मण भोजराज डोकळे (वय 34, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी ई 6481) आळंदी येथील विश्वशांती केंद्रापासून चोरीला गेली आहे.

स्वप्नील सोमनाथ पाचभाई (वय 33, रा. शिंदेवाडी, ता. मुळशी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 42 / आर 7414) अज्ञात चोरट्यांनी कार्निवल प्रीमियर प्लाझा चिंचवड येथील पार्किंग मधून चोरीला गेली आहे.

भाऊसाहेब धर्मा भोसले (वय 42, रा. सांगुर्डी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी एल 5527) अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरापासून चोरून नेली.

संतोषनगर थेरगाव येथे सायकल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदीप शिवाजी तापकीर (वय 38, रा. संतोषनगर थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंद्र विश्वनाथ झेंडे (वय 25, रा. डांगे चौक, ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मुलाची 10 हजार रुपये किमतीची सायकल आरोपीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.