India Corona Update : देशात 12,514 नवे कोरोना रुग्ण, त्यापैकी केरळमध्ये 7,167 रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 514 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 7 हजार 167 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 42 लाख 85 हजार 814 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 68 हजार 560 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 12 हजार 718 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.20 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 251 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 58 हजार 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात 1 लाख 58 हजार 437 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 248 दिवसांतील हा नीचांक आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 60 कोटी 92 लाख 01 हजार 294 नमूने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 8 लाख 81 हजार 379 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 106 कोटी 31 लाख 24 हजार 205 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.