Thergaon News: लग्नाचे आमिष दाखवून. बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला व आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. 2016 ते 2020 या कालावधीत डांगे चौक, थेरगाव परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेनं शुक्रवारी (दि. 11 फेब्रुवारी) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश रामलाल फंदी (वय 31, रा. थेरगाव) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

https://www.youtube.com/watch?v=HdlL86uoF0I
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री करुन लग्नाचे आमिष दिले. त्यातून महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक आत्याचार केला तसेच, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.