Pune News: ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे  निधन   

एमपीसी न्यूज: दिग्गज उद्योजक राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राण ज्योत मालवली.  

 

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.