Chinchwad Crime News : आर्थिक कारणावरून रस्त्यात अडवून एकास मारहाण; महिलेसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आर्थिक कारणांवरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला रस्त्यात अडवले. महिलेने व्यक्तीला लाकडाने तर अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

रवींद्र सुरेश वायकुळे (वय 34, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय धिवार, अभिजित शिंदे, निशा अडसूळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वायकुळे बुधवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. वाल्हेकरवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ ते तंबाखू घेण्यासाठी थांबले. त्यावेळी आरोपी निशा हिने अडसूळ यांच्यासोबत पैशांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून वाद केला.

विजय आणि अभिजित यांनी अडसूळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निशा हिने अडसूळ यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.