Pune Crime News : पतीचे अनैतिक संबंध अन् सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेजल (शेजल) सुनिल जगधणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. 5 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तेजल हिचा भाऊ विशाल दोडके (वय 23) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पती सुनिल, सासू व ननंद तसेच मैत्रिण यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल व सुनिल यांचा जानेवारी 2021 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर ते खडक परिसरात राहत होते. दरम्यान, सुनिल याची एक मैत्रिण होती. त्याची माहिती तेजल यांना समजली होती. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. त्यानंतर सुनिल हा पत्नी तेजल हिचा मानसिक व शारिरीक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तेजल यांनी 5 नोव्हेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते.

या सर्व घटनेनंतर तेजल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, दुसऱ्या दिवशी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खडक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.