Wakad News : तीन वेळा गर्भवती, तीन वेळा गर्भपात ; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार 

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला, त्यातून तीन महिला गर्भवती राहिली आणि तिन्ही वेळा गर्भपात केला. 15 जानेवारी 2021 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत वाकड परिसरात ही घटना घडली. 

पिडीत महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आकाश बुचडे (वय 26, रा. बुचडे वस्ती, मारुंजी) या इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 313 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास निर्माण केला व एकत्र राहू असे सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले, त्यातून तब्बल तीन वेळा महिला गर्भवती राहिली व तिन्ही वेळा गर्भपात करण्याच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.