Pune Corona Update: कोरोनाचे आज 271 नवीन रुग्ण; 138 जण बरे होऊन घरी परतले

today 271 corona positive patients found, 138 recovered and 6 death in pune

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. रविवारी (दि. 31) कोरोनाचे 271 नवीन रुग्ण आढळले. 138 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत 314 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 173 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 42 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोरोनाचे पुण्यात एकूण 6 हजार 472 रुग्ण आहेत.

पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 376 आहे. तर, आजपर्यंत एकूण 3 हजार 782 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनाच्या 359 चाचण्या करण्यात आल्या.

येरवड्यातील 65 वर्षीय महिलेचा नगर रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 80 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 80 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा सिम्ब्योसिस हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 52 वर्षीय पुरुषाचा कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 63 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुण्यात मे अखेरीस 6 हजार 472 रुग्ण झाले आहेत. महापालिका प्रशासनाला 5 हजार रुग्ण अपेक्षित होते. त्यामध्ये 1 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे. जून महिन्यात तर 23 हजार रुग्ण होणार असल्याचा अंदाज पुणे स्मार्ट सिटीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

त्यादृष्टीने आता महापालिकेतर्फे नियोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त बेड राखीव ठेवण्यासाठी खासगी हॉस्पिटशी संपर्क करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.