Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस

सहावी जागा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांवरील (Rajya Sabha Election 2022) उमेदवार बिनविरोध निवडून येणार की त्यांच्यात अटीतटीची लढत होणार हे पाहणे आज (दि. 03मे) महत्त्वाचे ठरणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सगळ्याच पक्षाकडून आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीसुद्धा सहावी जागा बिनविरोध येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यसभा निवडणुकीबाबतचे हे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. 

यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभेतील आमदारांकडून राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात येते, त्यामुळे यावेळी कोणता पक्ष वरचढ चढणार हे आता संख्यबळावरूनच स्पष्ट होईल. दरम्यान, सर्वाधिक चर्चेत आलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक उभे आहेत, परंतु ही सहावी जागा बिनविरोध निवडून यावी यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असून, यासाठी वाटाघाटीचे सूत्र अवलंबण्यात येत आहे. दरम्यान दुपारपर्यंत याबाबत चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

Maval News : जिल्हा परिषद गट व मावळ पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचना जाहीर

विधानसभा संख्याबळानुसार भाजपला सहज दोन जागा मिळवता येणार आहेत, तर महाविकास आघाडी पक्ष आपले एक एक उमेदवार विजयी करू शकतो. सहावी जागा मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि अपक्ष यांच्यात जोरदार तयारी सुरू असून महाविकास आघाडीकडे असलेली अतिरिक्त मते आणि अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याने शिवसेना सहावी जागा लढवणार आहे, तर भाजपला सुद्धा सहावी जागा लढवण्यासाठी 13 मतांची गरज आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) कशी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.