DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; सकाळी सात पासून उद्घाटन, भूमिपूजनाचा धडाका सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) करण्यात आले.

शपवार यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून माहिती घेतली. केंद्राचे समन्वयक कर्नल संदीप चहल यांनी केंद्र व केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. केंद्रामार्फत वय वर्षे 13 ते 17 या वयोगटातील विद्यार्थ्यांना रोईंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण 15 विद्यार्थी खेळाडूंची रोईंग खेळाच्या प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली असून या खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण आर्मी रोईंग बोड, सी.एम.ई. कासारवाडी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार तसेच या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होणार होणार असल्याचे चहल यांनी सांगितले. क्रीडा विभागाच्या सुषमा शिंदे यांनीही क्रीडा विभगाच्यावतीने येथे सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी रोईंग प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कीट वाटप करण्यात आले.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस

आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्या वतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.

भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.