Today’s Horoscope 17 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख – 17.11.2023

शुभाशुभ विचार – 19 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वाशाढा.

चंद्र राशी – धनु.
—————————–
मेष  ( शुभ रंग – क्रीम)

नोकरी धंद्याच्या दृष्टीने काहीसा विरोधी दिवस आहे. आज आक्रमकता कामाची नाही. प्रत्येक निर्णय विचारांची घ्यायला हवा. नास्तिक ही आज देवाला नवस बोलतील.

वृषभ ( शुभ रंग- पांढरा)

आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध राहा. आज जोडीदाराच्या कलाने घ्या. नव्या उपक्रमाची सुरुवात उद्यावर ढकललेली बरी.

मिथुन  ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही प्रचंड उत्साही व आशावादी असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावात येईल. उद्याची कामे शक्य झाल्यास आजच उरकून घेणे हिताचे राहील.

कर्क  ( शुभ रंग – मरून)

आज काही जुन्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. आज तुम्हाला विश्रांतीची ही गरज भासेल. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे. कुसंगत टाळणे हिताचे राहील.

सिंह ( शुभ रंग – पिस्ता)

कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. आज तरुण मंडळी व्यक्तिमत्व विकासावर भर देतील.

कन्या  ( शुभ रंग- जांभळा)

प्रॉपर्टी विषयक रखडलेली कामे गती घेतील. विविध गृह उद्योगातून गृहिणींना चांगलीच कमाई होईल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आज व्यस्त दिवस.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होईल. आज कदाचित वाहन रस्त्यात रुसून बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा. शेजार्यांशी असलेले मतभेद दूर होतील.

वृश्चिक ( शुभरंग – चंदेरी)

विविध मार्गाने आलेला पैसा खर्च करण्याचेही विविध मार्ग तुम्हाला सुचतील. नेते मंडळींच्या वक्तृत्वाने आज कार्यकर्ते प्रभावित होतील. शब्दांचा वापर जपून करावा.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काहीसे लहरीपणाने वागाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा आज प्रयत्न राहील. आज एखादा मन हळवे करणारा प्रसंग घडू शकतो. वास्तवतेचे भान ठेवा.

मकर (शुभ रंग- केशरी)

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची ओढाताण होईल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल. आज प्रवास कराल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज जसे चिंताल तसे होईल अतिस्पष्ट वक्तेपणाला आवर घालायला हवा.

मीन ( शुभ रंग- डाळिंबी)

मित्रमंडळींना दोन हात लांबच ठेवून आपल्या ध्येयप्राप्तीस तुम्ही प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकांनाही तुमचे विचार प्रभावित करतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.