Pimpri News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पाऊले उचला; गृहमंत्र्यांकडे मागणी

कृषी, पर्यावरण ,शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी केली मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी कृषी,पर्यावरण , शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नुकत्याच काळेवाडी फाट्यावर तसेच आकुर्डी मध्ये आयटी क्षेत्रात व रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याद्वारे तसेच धारदार शास्त्राद्वारे हल्ला करून लुटमारीची प्रकरणे झाली आहेत. आयटी सेक्टर हे पिंपरी-चिंचवड शहरालगत असून नाईट शिफ्टला असणारे कर्मचारीवर्ग यांना रात्री प्रवास करावा लागतो.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. रात्री, अपरात्री लुटण्याचे प्रकार पुन्हा होऊ नयेत यावर उपाययोजना कराव्यात तसेच रात्रीचे पेट्रोलिंग वाढवावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिक तसेच कर्मचारीवर्ग सुरक्षित राहिल, अज्ञात इसमांकडून अशाप्रकारे घटना घडण्याचे प्रकार कशाप्रकारे थांबवले जातील.

यापुढे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होईल यासाठी पोलिसांमार्फत योग्य ती कार्यवाही करावी. शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी योग्य ती कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.