Moshi Crime News : मोशी, किवळे येथे दोन घरफोड्या; 64 ग्रॅम सोने, 555 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किवळे येथे दोन घरफोड्या झाल्या. या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे 64 ग्रॅम सोन्याचे आणि 555 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शनिवारी (दि. 13) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

रवींद्र सुबराव मोहिते (वय 36, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी पहाटे दोन ते चार वाजताच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातून एक लाख 78 हजार 500 रुपये किमतीचे 44 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 555 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला त्यांच्या घराला कुलुप लावून गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून दोन तोळे वजनाचे 49 हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार बुधवार (दि. 10) रात्री साडेअकरा ते शनिवार (दि. 13) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत मुकाई चौक, किवळे येथे घडला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.