Talegaon crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तळेगाव खिंडीत थांबून नागरिकांना अश्लील हातवारे करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Talegaon crime) ही कारवाई मंगळवारी (दि. 15) दुपारी करण्यात आली.

Pune news : फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून 24 कोटी सात लाख मंजूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तळेगाव खिंडीत थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हातवारे करीत होत्या.  (Talegaon crime) वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांचे कृत्य सुरु असल्याचे पोलिसांना समजले असता पोलिसांनी दोन्ही महिलांवर कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.