Vadgaon Maval News : पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पोलीसांना छत्री वाटप 

एमपीसी न्यूज – पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य ) –  मावळ विभागाच्या वतीने वडगांव व तळेगाव मावळ येथील पोलीस बांधवाना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 

पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वडगांव मावळचे अध्यक्ष मंगेश खैरे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या पावसाळा  सुरु झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना ऊन, पाऊस यापासून आपल्या पोलीस बांधवाचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री वाटप करण्यात आले असे आपल्या प्रास्ताविकात वडगांव मावळचे अध्यक्ष मंगेश खैरे यांनी सांगितले.

वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निंबाळकर, पोलीस सब इन्स्पेक्टर चामे साहेब,मनोज कदम, वडोदे साहेब ,काळे, माने,ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस निरीक्षक शहाजी पवार, यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे सहसचिव भालचंद्र बांगर,मावळचे अध्यक्ष अतुल भेगडे, देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार, तळेगाव शहर अध्यक्ष बजरंग रंधवे, कामशेत शहर युवक अध्यक्ष चेतन वाघमारे यांचे योगदान लाभले तसेच सभासद अभिषेक मुरकुटे,रवींद्र म्हाळसकर , ऋषिकेश मुरकुटे, शैलेश वहिले, महेश सुतार, आशिष भालेराव, किरण ओव्हाळ ,संदीप नवघने, अनिकेत ढमाले ,ओम सूर्यवंशी, किरण ढोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.