union budget 2021 live updates : 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेचा फायदा

एमपीसी न्यूज : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले ,’ लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना झाला. ‘

त्या पुढे म्हणाल्या, ‘ ८ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळले. लॉक डाउनच्या काळात मोठ्या संख्येत लोकं आपापल्या घरात होती. मात्र आरोग्य सेवक ते शेतकरी आणि जवान कार्यरत होते. त्याचे मी आभार मानते.’

१५ वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’

जुन्या वाहनांचा फिटनेस तपासला जाणार असून जुनी वाहने मोडीत निघणार. -अर्थमंत्री


मिशन पोषण २.० ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा -अर्थमंत्री


अर्बन स्वच्छ भारत मिशन २.० साठी १ लाख ४१ हजार ६७८ कोटी २०२१


जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजारांची तरतूद, अनेक शहरांसाठी जलजीवन मिशन राबवणार – अर्थमंत्री


अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद


पीएम आत्मनिर्भर स्वास्थ भारत योजना, स्वास्थ भारतासाठी ६४ हजार १८० कोटींची घोषणा – अर्थमंत्री


देशात नव्या आरोग्य संस्था उभारणार तसेच आरोग्य संस्थांना बळकटी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न – अर्थमंत्री


अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचं व्हिजन असणार असून आत्मनिर्भर भारतात तरूणांना संधी देण्यात येणार -अर्थमंत्री


शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असून शेती क्षेत्र मजबूत करण्यावर अधिक भर – अर्थमंत्री


कोरोनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा केला- अर्थमंत्री


आत्मनिर्भर भारताच्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक देशांना कोरोनाची लस देणार -अर्थमंत्री


८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं यासह ८ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन देखील देण्यात आले- अर्थमंत्री


निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणून कोरोना काळात अनेक योजना देशात आणल्यात जेणेकरून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये एकूण २७.१ लाख कोटी रुपये जाहीर झाले. हे सर्व पाच मिनी बजेटसारखेच होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.