Vaccination Guidelines : लसीकरण नियमावलीत बदल, कोरोनामुक्त झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी घ्या लस

एमपीसी न्यूज – कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोविड -19 (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यामध्ये केंद्र सरकारने लसीकरण विषयीच्या नियमावलीमध्ये केले महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

नव्या नियमावलीनुसार, पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना कोरोनाची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेलेत. त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घेण्यास सांगितलं आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना चार ते पाच आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.