Pune News : दुसऱ्या फेरीत 184 जणांचे लसीकरण 

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू आहे. याच्या दुसऱ्या फेरीत पुण्यातील 184 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली.

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 52, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 55, कोथरूडमधील सुतार हॉस्पिटल 8, बी.जे.मेडिकल कॉलेज 30 आणि रूबी हॉल क्लिनीकमध्ये 39 असे एकूण 184 जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी दिली.

तर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल म्हणाल्या, केंद्रसरकारच्या निर्देशानुसार ज्या रुग्णांचे नाव संकेतस्थळावर येते त्यांना लसीकरण केले जात आहे. परंतु कोवीन ॲपचे संकेतस्थळ अद्यापही हँग होत असल्यामुळे अडथळा येत आहे. परंतु आम्ही जे उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार लस देतो. जर एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर त्याऐवजी अन्य दुसऱ्या कर्मचाऱ्यांना लस देत आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उद्या (गुरूवारी) लसीकरणाची फेरी नसेल गुरूवार व शुक्रवारी मात्र पुढील फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.