Pimpri News: शहरात लस टंचाई सुरूच, आज केवळ ‘ही’ 8 केंद्रे सुरू

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीची पुन्हा एकदा टंचाई निर्माण झाली आहे. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध  नसल्याने  पिंपरी- चिंचवड शहरातील केवळ 8 लसीकरण केंद्रे आज (शुक्रवारी) सुरू राहणार आहेत.  त्यामुळे या 8 केंद्रांवर किती जणांचे लसीकरण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात एकूण 100 पेक्षा जास्त ( महापालिका 60 आणि खासगी – 29 ) लसीकरण केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते. परंतु, लसीचा साठा कमी असल्याने केंद्रे बंद करावी लागली आहेत. केंद्रामध्ये घट होत चालली आहे. अनेक केंद्र लसीअभावी बंद आहेत. नागरिकांना लस मिळत नाही. लस न घेता परत जावे लागते. रांगेत थांबूनही लस मिळत नाही.  दोन दिवसांपूर्वी लसीचा साठा नसल्याने केवळ 12 केंद्रे चालू ठेवली होती.

दोन दिवस महापालिकेला लस मिळाली नव्हती. त्यानंतर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या  ‘कोव्हिशील्ड’चे 15 हजार डोस  बुधवारी मिळाले होते. गुरूवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्रे  सुरू होती. त्यानंतर आज पुन्हा लसीची टंचाई आहे. आजही लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.  लस उपलब्ध नसल्यामुळे आज 8 लसीकरण केंद्रे  कार्यरत असणार आहेत. या 8 केंद्रांवरच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

ही लसीकरण केंद्रे आज सुरू राहणार!

कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रूग्णालय,वायसीएम हॉस्पिटल, तालेरा हॉस्पिटल,  सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता हॉस्पिटल पिंपरी, ईएसआयएस रुग्णालय आणि वाकड येथील पीसीएमसी प्राथमिक शाळा ही आठ लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.