Vadgaon Maval : पोल्ट्री व्यावसायिकांना ग्रामपंचायतींकडून वाढीव कर आकारणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी पोल्ट्री व्यावसायिकांना अवाजवी व अवास्तव कर आकारणी केली आहे. ही वाढीव कर आकारणी जाचक असून ती त्वरित रद्द करावी अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत संघटनेने आमदार सुनील शेळके यांना सोमवारी (दि.22) निवेदन दिले आहे.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात मावळचे आमदार सुनील शेळके यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वाढीव कर आकारणी बाबत माहिती दिली.

याप्रसंगी पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी तसेच उद्योजक एकनाथ गाडे, सचिन आवटे, संभाजी केदारी, सुभाष केदारी,प्रवीण शिंदे, सचिन गरूड,शांताराम लोहोर, विनायक बधाले, महेश कुडले, रामदास सुतार सोमनाथ राक्षे, गणपत पोटफोडे, भाऊ दळवी, शिवाजी शिंदे, बाबाजी पठारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या नियमानुसार मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी गावपातळीवरील पोल्ट्री फार्मवर नव्याने कर आकारणी केलेली आहे. ही वाढीव कर आकारणी जाचक असून ती त्वरित रद्द करावी अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेळके यांचेकडे केली असून याबाबत मी सर्व चौकशी – माहीती घेऊन आपल्याला न्याय देण्याचे काम करीन असे आश्वासन यावेळी आमदार शेळके यांनी दिले. तर त्यानंतर मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची समक्ष भेट घेऊन त्यांनाही माहिती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.