Wakad : नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नायलॉन मांजा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका(Wakad ) दुकानदारावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी ज्योतिबानगर मधील शितल प्रोविजन अँड जनरल स्टोअर या दुकानात करण्यात आली.

विजय रामेश्वर गायकवाड (वय 37, रा. ज्योतिबानगर, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : गोमांस वाहतूक प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय गायकवाड याने त्याच्या(Wakad) दुकानामध्ये नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता खंडणी विरोधी पक्षाने कारवाई करत विजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

नायलॉन मांजामुळे प्राण्यांसह मानवी जीवाला ही धोका निर्माण होत आहे. अनेकांनी या मांजामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 31 डिसेंबर 2020 रोजी नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. तसेच मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना याप्रकरणी कारवाया करण्याचे देखील आदेश दिले होते. याबाबत राज्यभर कारवायांचे सत्र सुरू असताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मांजा विक्री प्रकरणी कारवाई केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.