Wakad : मुलाला कुकरने मारणाऱ्या आईवर गुन्हा; काळेवाडी येथील घटना

एमपीसी न्यूज – मुलाच्या बोलण्याचा राग आल्यामुळे आईन डोक्‍यात कुकर मारून मुलाला जखमी केले. ही घटना काळेवाडी येथे घडली.

सविता संजय लोणारे (वय 42, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आईचे नाव आहे. नेहाल ऊर्फ सनी संजय लोणारे (वय 22, रा. रामनगर, रहाटणी) असे जखमी मुलाचे नाव असून त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सविता व नेहाल यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी मुलाच्या बोलण्याचा राग आल्याने आईने त्याच्या डोक्‍यात कुकर मारून जखमी केले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिनरीक्षक मडके करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.