Wakad News : भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – वाकड चौक येथे सार्वजनिक रस्त्यावरून पायी चालत जाणार्या अज्ञात तरुणाला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणांचा मृत्यू झाला आहे. हि घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी सहाच्या सुमारास वाकड चौक येथे घडली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रामचंद्र मारुती तळपे (वय.33) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 35 वर्षीय अज्ञात तरुण वाकड चौक येथून सार्वजनिक रस्त्यावरून औधकडे पायी चालत निघाला होता. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने तरूणाला धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.