Wakad : डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज – एका ज्येष्ठ नागरिकांच्या डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

वसंत शामराव हरोलीकर (वय 60, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी हरोलीकर यांच्या डेबीट कार्डाच्या माहितीचा वापर करून त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये परस्पर काढून घेतले. विशेष म्हणजे हरोलीकर यांनी कोणाशीही ओटीपी क्रमांक शेअर केलेला नव्हता. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमान बांगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.