Wakad : चहा पिताना तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – चहा पिण्यासाठी चहाच्या गाडीवर थांबलेल्या तरुणावर तिघांनी मिळून लोखंडी कोयत्याने खांद्यावर वार केले. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री नऊ वाजता चौधरी पार्क वाकड येथे घडली.

महेश शहादेव पटेकर (वय 22, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण घाडगे, रवींद्र घाडगे, अशोक तुपेरे (सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश चहा पिण्यासाठी चौधरी पार्क जवळ असलेली चहाच्या गाडीवर थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले आणि त्यांनी महेश यांना शिवीगाळ करून हाताने वेब लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने महेश यांच्या खांद्यावर वार केले. यामध्ये महेश जखमी झाले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.