Wakad : 100 कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दीड कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – मित्राला शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे व्यावसायिकाच्या खात्यात जमा करायचे आहेत. असे आमिष दाखवून 14 जणांनी मिळून एका व्यावसायिकाकडून वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली 1 कोटी 52 लाख 27 हजार 400 रुपये भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2012 ते एप्रिल 2019 या कालावधीत केरळ, दिल्ली आणि वाकड या ठिकाणी घडला.

राकेश गंगाधर कोटोला (वय 44, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात महिलेने राकेश यांना फोन करून सांगितले की, त्यांचे मित्र के शिवदासन यांना शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. या लॉटरीचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा करायचे आहेत. त्यासाठी जीएसटी, ट्रान्सफर चार्जेस, ड्युमरेज चार्जेस, कन्वर्जन चार्जेस, मनी लाँडरिंग चार्जेस, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि हॉटेल बिल अशा विविध चार्जेसच्या नावाखाली 14 जणांनी मिळून राकेश यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर 1 कोटी 52 लाख 27 हजार 400 रुपये घेतले.

सर्व प्रकारच्या चार्जेसचे पैसे देऊनही आरोपींनी लॉटरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले नाही. यावरून राकेश यांनी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. वाकड पोलिस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.