Wakad : लॉकडाऊनमध्ये वाहनचोरी, घरफोडी करणारा सराईत अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात वाहनचोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करत चार गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात वाकड पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार बिभीषण कन्हेरकर यांना माहिती मिळाली की, घरफोडी आणि वाहनचोरी करणारा एक अल्पवयीन चोरटा डी मार्ट येथे येथे दुचाकीवरून फिरत आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. .

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 83 हजार रुपयांच्या चोरीचे दागिने आणि तीन दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील एक असे चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन चोरट्यावर यापूर्वी 13 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषण कर्मचारी, प्रमोद कदम, सचिन जगताप, नितीन ढोरजे, दीपक भोसले, जावेद पठाण, बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, बाबाजान इनामदार, विजय गंभीरे, शाम बाबा, सुरज सुतार, विक्रम कुदळ, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, प्रमोद भांडवलकर, सुरेश भोसले, तात्या शिंदे, सचिन नरुटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.