Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांना यापुढेही एक दिवसाआडच पाणीपुरवठा- आयुक्त हर्डीकर

Water supply to Pimpri-Chinchwad still a day after - Commissioner Hardikar पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे.

एमपीसी न्यूज – मागील साडेआठ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना यापुढे देखील एकदिवसाआडच पाणी मिळणार आहे. सध्या आहे तसाच एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढेही कायम राहणार असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यात एकदिवसाआडऐवजी दररोज पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. ‘जोपर्यंत 30 एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआडच पाणीपुरवठा कायम’ राहणार असल्याचे आठ महिन्यांपासून पालिकेकडून सांगितले जात आहे.

परंतु, पाणी वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकांना यंदाच्या पावसाळ्यात देखील एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यापुढे देखील एक दिवसाआडच पाणीपुरवठा राहणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.