Pimple Nilakh News: ‘आम्ही इथले भाई आहोत’,  मारहाण करून मोबाईल पळविला

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून एकास खाली पाडून छातीवर बसून, सिमेंटच्या गट्ट्ूने मारहाण करून, मोबाईल पळविला. व जमलेल्या लोकांकडे पाहून ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणाची नडायची ताकद आहे का आमच्याशी? असे म्हणत चार आरोपींनी दहशत पसरविली. हि घटना पिंपळे निलख येथे शनिवार (दि. 16) रोजी रा. 10.30 मि. घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फि र्यादी सोहम राहुल शिंदे, (वय 19 रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) यांना आरोपी कुणाल संभाजी सातकर (वय 22 रा. इंगवले चौक) प्रसाद पांडुरंग पवार (वय 21, रा. खरडे पाटील खोमणे आळी) संकेत राजेंद्र मुरकुटे (वय 20, हनुमान मंदिराजवळ) जीवन रमेश लोंढे, (वय 18, रा. ओमसाई बी शिक्षक सोसायटी) यांनी बोलावून खुन्नस का देतोस असे म्हणत खाली पाडले व छातीवर बसून हाताने व सिमेंटचा गट्ट्ु डोक्यावर मारून गंभिर जखमी केले. आरोपी जिवन लोंढे याने फि र्यादीच्या खिशातून दहा हजार रू. किं. चा मोबाईल काढून पळून गेला. व फि र्यादीचा मित्र वैभव संजय ढोरे यास मारहाण करीत दहशत परविली.

याविरोधात फि र्यादीने सांगवी पोलिस ठाण्यात रविवार (दि. 17) रोजी दु. तीन वा. तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीं विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अटक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.