Maval News : मुलगी झाल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा दाबून खून

एमपीसी न्यूज – मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नी रात्री झोपेत असताना पतीने हा गुन्हा केला. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ येथे उघडकीस आली.

चांगुणा योगेश जाधव (वय 20, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत शवाजी दामू ठाकर (वय 43, रा. ठाकरवाडी, परंदवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश कैलास जाधव (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांगुणा आणि आरोपी योगेश हे पती-पत्नी असून ते चंदनवाडी येथे राहत होते. चांगुणा हिला पहिली मुलगी झाली या कारणावरून योगेशने तिचा वेळोवेळी हाताने मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला.

शुक्रवारी (दि. 27) रात्री आठ वाजता चांगुणा झोपी गेली. रात्री झोपेत योगेश याने चांगुणाचा गळा आवळून खून केला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. पोलिसांनी योगेशला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.