Pimpri : सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील असे कामकाज करणार – महापौर राहुल जाधव 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून देशभरात परिचित असून कष्टक-यांची नगरी आहे. मी स्वत: रिक्षा चालविला आहे. त्यामुळे कष्टक-यांचे हाल-अपेष्टा माहित आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकापर्यंत पालिकेच्या योजना पोहोचविण्याचे काम करणार, असे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच सर्वांना सोबत घेऊन ऐतिहासिक आठवण राहील असे कामकाज करणार असल्याचेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहराचे 25 वे तर भाजपचे दुसरे महापौर म्हणून राहुल जाधव यांची आज (शनिवारी) निवड झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्याला जबाबादारीची जाणीव असल्याचे सांगत महापौर जाधव म्हणाले, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तळागाळातील नागरिकापर्यंत विकास पोहचविणार असून शहराचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार आहे.

आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत ज्यांनी सहकार्य केले. त्यांना मानाचा मुजरा करत असल्याचेही, जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.