Pune News : रस्ता ओलांडताना पीएमपीच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरात रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसच्या चाकाखाली सापडल्याने एका ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात बुधवारी हा अपघात झाला. पद्मा पंढरीनाथ गायकवाड (वय 75) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीएमपीएल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पद्मा गायकवाड या विश्रांतवाडी चौकाकडून भोसरी कडे जाणाऱ्या बसच्या चाकाखाली सापडल्या. यावेळी बसने त्यांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पद्मा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी बस चालक व वाहक यांना ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.