कष्ट आणि निष्ठा यांना पर्याय नाही – डॉ. दिलीप सिंह मोहिते

एमपीसी न्यूज – कष्ट आणि निष्ठा यांना पर्याय नाही. या दोन गोष्टींमुळे आपण काम करीत असलेल्या उद्योगाची भरभराट होतेच; पण आपली स्वतःचीही प्रगती होते. असा संदेश ज्येष्ठ उद्योजक डॉ. दिलीपसिंह मोहिते (Dr.Dilipsingh Mohite Patil) यांनी दिला आहे.

Dasara melava : ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

भोसरी औद्योगिक वसाहतीतील (Bhosari Industrial Estate) पेठ क्रमांक 10 मधील डाय प्लास्ट इंडस्ट्री (Die Plastic Industry) येथे खंडेनवमीनिमित्त मोहिते यांच्या हस्ते कामगारांना सन्मानित करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक देवीदास ढमे, हाजी अब्दुल शिकलगार, डाय प्लास्टचे भागीदार रफीक शिकलगार, लेखाधिकारी रुचिता मोरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भागीदार सलीम शिकलगार म्हणाले की, “2021 सालापासून स्वयंचलित यंत्राच्या सुट्या भागांची दर्जेदार निर्मिती आम्ही करीत आहोत. या दहा वर्षांच्या कालावधीत आमच्या कामगारांनी सातत्याने घेतलेले श्रम अन् दिलेल्या योगदानामुळे आम्ही औद्योगिक क्षेत्रांत नावलौकिक मिळवू शकलो!” याप्रसंगी कंपनीच्या स्थापनेपासून आजतागायत कार्यरत असलेल्या सुरेश ढोबाळे, तोसीफ शिकलगार, प्रदीप मांझी, किशोर पासवान आणि दीपक बाला यांच्यासह इतर बावीस कामगारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यंत्रपूजन करून आपल्या कुटुंबीयांसह कामगारांनी स्नेहमेळाव्यात सहभाग घेतला. रफीक शिकलगार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.