World Corona Update: जगात कोरोनाचे खरे रुग्ण किती? 47 लाख की 26 लाख? जाणून घ्या आकड्यांची वस्तुस्थिती!

World Corona Update: Hopeful! Significant reduction in the number of active patients! Out of a total of 47 lakh corona patients, 26 lakh active patients!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – जगातील व विविध देशांमधील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोना बळींचा आकडा सातत्याने वाढत असल्याने लोकांच्या मनातही कोरोनाची ‘दहशत’ निर्माण होत आहे, मात्र कोरोनाबाधितांची एकूण संख्या आणि सक्रिय कोरोना रुग्ण या संकल्पनेतील फरक लक्षात घेतला तर कोरोनाची खरी परिस्थिती आपल्याला समजू शकते आणि कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. आतापर्यंत सक्रिय कोरोनाबाधितांचे प्रमाण 45 टक्क्यांनी घटून 55 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जगात आतापर्यंत सुमारे 47 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी त्यातून बरे झालेले आणि मृत रुग्णांची संख्या वजा केल्यानंतर सध्या कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 26 लाख असल्याचे दिसून येते. 

टीव्हीवरील बातम्यांमध्ये कोरोनाबाधितांचे व कोरोना बळींचे एकूण आकडेच वारंवार दाखविले जात असल्याने सर्वसामान्य माणूस हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जगात 47 कोरोनाबाधित असल्याचे सांगितले जात असले तरी साफ चूक आहे.

जगात सक्रिय रुग्ण 26 लाखांपेक्षा कमी आहेत. उर्वरित रुग्णांपैकी 18 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सुमारे तीन रुग्ण मरण पावले आहेत. जगातील, देशातील, राज्यातील एवढेच नव्हे तर आपल्या शहरातील बऱ्या होणाऱ्या आणि सक्रिय रुग्णांच्या संख्या ठळकपणे दाखविण्याची गरज आहे. त्यातून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांचे मनोबल वाढण्यास निश्चित मदत होईल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सक्रिय रुग्णांमध्येही सौम्य प्रकारचा कोरोना आजार असलेल्यांची संख्या तब्बल 98 टक्के आहे, म्हणजेच केवळ दोन टक्के कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. कोणतेही खात्रीशीर औषध अथवा उपचारपद्धती उपलब्ध नसताना देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनावर मात करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना हा अतिशय जीवघेणा आजार असल्याच्या गैरसमजातून आता तरी लोकांनी बाहेर येऊन हिमतीने या आजाराचा मुकाबला करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 47 लाख 19 हजार 057 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 13 हजार 180 (6.64 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 11 हजार 567 (38.39 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 25 लाख 94 हजार 310 (54.97 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 25 लाख 49 हजार 482 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 44 हजार 828 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

14 मे – नवे रुग्ण 96 हजार 334  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 317

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

16 मे – नवे रुग्ण 95 हजार 518 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 360

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 90 हजारांच्या पुढे

अमेरिकेत शनिवारी 1,218 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 90 हजार 113 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 15 लाख 07 हजार 773 झाली आहे तर 3 लाख 39 हजार 232 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (शनिवारी) 816, इंग्लंडमध्ये 468, मेक्सिकोमध्ये 290 तर इटलीमध्ये 153 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. काल पेरू 131, रशिया 119, भारत 118 व कॅनडा 117, स्पेन 104, फ्रान्स 96, इक्वाडोरमध्ये 94 तर जर्मनीत 26 बळी गेले आहेत.रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जागतिक क्रमवारीत ब्राझील पाचव्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील आणि मेक्सिको या दोन देशांनी (शनिवारी) वरचे स्थान मिळवले आहे. इटलीला मागे टाकत ब्राझीलने सहाव्या स्थानावरून पाचवे स्थान मिळविले इटली सहाव्या स्थानावर गेला आहे.  मेक्सिकोने 18 व्या स्थानावरून 17 वे स्थान मिळविले आहे. नेदरलँड आता 18 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 15,07,773 (+23,488), मृत 90,113 (+1,218)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,76,505 (+2,138), मृत 27,563 (+104)
  3. रशिया – कोरोनाबाधित 2,72,043 (+9,200), मृत 2,537 (+119)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,40,161 (+3,450), मृत 34,466 (+468)
  5. ब्राझील – कोरोनाबाधित 2,33,142(14,919), मृत 15,633 (+816)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,24,760 (+875), मृत 31,763 (+153)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 179,365 (NA), मृत 27,625 (+96)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,76,247 (+548), मृत 8,027 (+26)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,48,067 (+1,610), मृत 4,096 (+41)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,18,392 (+1,757), मृत 6,937 (+35)
  11. भारत – कोरोनाबाधित 90,648 (+4,864) , मृत 2,871 (+118)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 88,541 (+4,046) , मृत 2,523 (+131)
  13. चीन – कोरोनाबाधित 82,941 (+8), मृत 4,633 (+0)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 75,864 (+1,251), मृत 5,679 (+117)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 54,989 (+345), मृत 9,005 (+46)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 52,016 (+2,840) मृत 302 (+10) 
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 45,032 (+2,437), मृत 4,767 (+290)
  18. नेदरलँड – कोरोनाबाधित 43,870 (+189), मृत 5,670 (+27)
  19. चिली – कोरोनाबाधित 41,428 (+1,886), मृत 421 (+27)
  20. पाकिस्तान – कोरोनाबाधित 38,799 (+1,581), मृत 834 (+31)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.