World Corona Update: 73 लाखांपैकी आता 33 लाख सक्रिय रुग्ण, 36 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

World Corona Update: Out of 73 lakh, now 33 lakh active patients, 36 lakh patients have overcome corona कोरोनावर मात करणाऱ्याचे प्रमाण 49.24 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 45.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे,

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 73 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 36 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता जगात सुमारे 33 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.65 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्याचे प्रमाण 49.24 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 45.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 73 लाख 16 हजार 944 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 13 हजार 627 (5.65 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 36 लाख 02 हजार 502 (49.24 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 33 लाख 00 हजार 815 (45.11 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 32 लाख 46 हजार 793 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 022 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990,  कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499

5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715,  कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177

7 जून – नवे रुग्ण 1 लाख 13 हजार 417,  कोरोनामुक्त 48 हजार 619, मृतांची संख्या 3 हजार 385

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 751,  कोरोनामुक्त 67 हजार 039, मृतांची संख्या 4 हजार 763

अमेरिकेत 7.88 लाख कोरोनामुक्त

अमेरिकेत काल (मंगळवारी) 1 हजार 093 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 14 हजार 148 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 20 लाख 45 हजार 549 झाली आहे तर 7 लाख 88 हजार 862 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला सात लाखांचा टप्पा

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1 हजार 185 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 38 हजार 497 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 42 हजार 084 झाली आहे तर 3 लाख 25 हजार 602 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविल्याने स्पेन आता पाचव्या स्थानावर

स्पेनने नवीन कोरोना संसर्गावर चांगले नियंत्रण मिळविल्याने स्पेनमधील कोरोना रुग्णवाढीचा वेग खूप मंदावला आहे. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण तर अगदी नगण्य झाले आहे. काल (मंगळवारी) स्पेनमध्ये कोरोनाचा एकही बळी गेलेला नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक क्रमवारीत आता स्पेन चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेला आहे, तर इंग्लंड पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहचला आहे.

मेक्सिकोत मंगळवारी 354, इंग्लंडमध्ये 286, भारतात 277,  रशियात 171, पेरूमध्ये 167 तर पाकिस्तानमध्ये 105 कोरोना बळी गेले आहेत. फ्रान्समध्ये 87,  दक्षिण अफ्रिका 82, इटलीत 79, इराण 74, कोलंबियात 64 तर कॅनडामध्ये 62 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे., 

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 20,45,549 (+19,056), मृत 1,14,148 (+1,093)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 7,42,084 (+31,197), मृत 38,497 (+1,185)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,85,253 (+8,595), मृत 6,142 (+171)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,89,140 (+1,741), मृत 40,883 (+286)
  5. स्पेन – कोरोनाबाधित 2,89,046 (+249), मृत 27,136 (+0)
  6. भारत – कोरोनाबाधित 2,76,146 (+10,218) , मृत 7,750 (+277)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,35,561 (+283), मृत 34,043 (+79)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 2,03,736 (+4,040) , मृत 5,738 (+167)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,86,516 (+311), मृत 8,831 (+48)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,75,927 (+2,095), मृत 8,425 (+74)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,72,114 (+993), मृत 4,729 (+18)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 154,591 (+403), मृत 29,296 (+87)
  13. चिली – कोरोनाबाधित 1,42,759 (+3,913), मृत 2,283 (+19)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,20,102 (+2,999), मृत 14,053 (+354)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 108,571 (+3,288) मृत 783 (+37)
  16. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,08,317 (+4,646), मृत 2,172 (+105)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 96,653 (+409), मृत 7,897 (+62)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,043 (+3), मृत 4,634 (0)
  19. कतार – कोरोनाबाधित 71,879 (+1,721), मृत 62 (+5)
  20. बांगलादेशकोरोनाबाधित 71,675 (+3,171), मृत 975 (+45)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.