Vadgaon Maval News : ‘त्या’ जखमी दुर्मिळ घुबडाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ मध्ये काही तरुणांना एक जखमी दुर्मिळ गव्हाणी जातीचे घुबड आढळले. ते घुबड जखमी असल्याचे लक्षात येताच त्याला वैद्यकीयपडताळणी नेले मात्र पुढील उपचार मिळण्याआधीच त्याचा अंत झाला.

वडगाव मावळ जवळील मोहितेवाडी येथे पार्लेजी कंपनीच्या नजीकच्या परिसरात शतपावली साठी निघालेल्या तरुणांना रस्त्यालगत जखमी घुबड दिसले. घुबड जखमी असल्याचे लक्षाच येताच तात्काळ संबंधित युवकांनी इंद्रायणी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्रमुख वन्यप्रेमी रोहित नागलगाव यांना संपर्क केला.

त्यांच्या निर्देशानुसार वडगाव येथील वाईल्ड रेस्क्यू टीम चे सदस्य जिगर सोळंकी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घुबडाला आवश्यक प्रथमोपचार करून वैद्यकीयपडताळणीसाठी नेले. दरम्यान, थंडीच्या वातावरणात तरुणांनी व वाईल्ड रेस्क्यू टीम च्या सदस्यांनी पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आज सकाळी दुर्दैवाने त्या जखमी घुबडाचा अंत झाला. त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील वाईल्ड रेस्क्यू मेडिकल मध्ये नेऊन चाचणी करण्यात येणार होती.

संबंधित घुबड हे तज्ञाच्या मते हायटेंशन विजेच्या धक्क्याने जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तरुणांच्या तत्परतेने हा दुर्मिळ पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु त्यात यश आले नाही. या घटनेच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी असलेली जाण प्रत्येक जनमाणसात असावी जो मुद्दा प्रकर्षाने पुन्हा एकदा समोर आला आहे.

(छायाचित्र : श्याम दत्तात्रय मालपोटे)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.