Talegaon Dabhade News : कोरोना निर्बंध हटविल्यानंतर तळेगावमध्ये रंगला कुस्त्यांचा फड; जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांचा सहभाग

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे वार्षिक उत्सवानिमित्त घेतल्या जाणा-या कुस्ती स्पर्धांकडे राज्यातील मल्लांचे लक्ष लागलेले असते. कोरोना साथीच्या काळात दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र कोरोना निर्बंध हटविल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा तळेगाव मध्ये कुस्त्यांचा फड रंगला. यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला.

गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी तळेगावची मोठी यात्रा भरते. यावर्षी उत्सव समितीच्या वतीने सुमारे 5 लाख 55 हजार 555 रुपयांचा इनाम ठेवण्यात आला होता. मान्यवरांकडून चांदीची गदा मोठ्या गटातील विजयी मल्लाला देण्यात आली.

कुस्ती आखाड्यात तळेगाव पंचक्रोशी तसेच मावळ तालुक्यातील नामवंत मल्ला बरोबरच पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून व कोल्हापूर,सांगली, सातारा, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती.
त्यातील काही मल्ल आणि वस्ताद मार्गदर्शकांचा उत्सव समितीने विशेष सत्कार केला.

दोन वर्षानंतर कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यामुळे यावर्षी वार्षिक उत्सवास नागरिक आणि कुस्तीगीर तसेच कुस्ती शौकिनांनी आखाड्यात मोठी गर्दी केली होती. घोरावडी रेल्वे स्टेशन जवळील भव्य पटांगणात हा कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला. या वर्षी राष्ट्रीय पातळीवरची कुस्ती स्पर्धा गाजविणाऱ्या अनेक मल्लांनी आखाड्यामध्ये कुस्त्या केल्या व बक्षिसाचे मानकरी ठरले.

यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ अनिल भेगडे व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.