Yashpal Sharma Dies : 1983 विश्वकप विजेत्या संघाचा नायक माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज – 1983 विश्वकप विजेत्या संघाचा नायक ठरलेला माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 1979 ते 1983 मध्ये ते भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज होते. त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवड समितीतही काम केले. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.

1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या तीन बाद 76 अशी होती, त्यानंतर भारताने 5 बाद 141 अशी मजल मारली. शर्मा यांनी 120 चेंडूंत 89 धावांची खेळी खेळली.

भारताकडून यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1,606 धावा केल्या आहेत. यात 140 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामन्यात 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.