BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल चोरी प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्याला युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

रमेश परमार (वय 20, हडपसर पुणे), असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रविवार पेठ येथून एका मुलीच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरून नेल्या प्रकरणातील एक संशयीत युवक वैदुवाडी हडपसर येथील एका म्हशीच्या गोठ्याजवळ थांबला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वैदुवाडी परिसरातील म्हशीच्या गोठ्याजवळ तपास केला असता तिथे आरोपी उभा असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने स्वतःचे नाव रमेश परमार असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ काळ्या रंगाचा 12 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल मिळून आला. याबाबत कसून चौकशी केली असता. हा मोबाईल काही दिवसापूर्वी रविवारपेठ येथून एका मुलीच्या हातातून हिसकावून चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like