Wakad News : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने तरुणास हातोडीने मारहाण

एमपीसी न्यूज – सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने तरुणाला हातोडीने बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी विशालनगर वाकड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुयोग गोविंद भापकर (वय 24, रा. भुजबळवस्ती, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन वाघमारे (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी सुयोग हे विशालनगर येथे चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादी सार्वजनिक ठिकाणी थुंकले. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच ‘मी सचिन वाघमारे इथलाच प्रॉपर आहे, समजलं का. थांब तुला दाखवतो’ असा दम देत आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात हातोडीने मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.