Pune Suicide News : ‘MPSC मायाजाल आहे, यात पडू नका’ चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : ‘MPSC मायाजाल आहे, यात पडू नका’ चिठ्ठी लिहून एका 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 24 वर्षीय तरुणाने अशाप्रकारे जीवन संपवल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या आत्महत्येने स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या मनातील घालमेल समोर आली आहे. 

स्वप्नील सुनील लोणकर असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की स्वप्निलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. बुधवारी आई-वडील घरी नसताना त्याने त्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे.

स्वप्नीलन लिहिलेली सुसाईड नोट…

“MPSC मायाजाल यात पडू नका”

Mpsc मेन्स 2019

Add- 2019

जूनला प्री क्रॅक केली

नोव्हेंबरला मेन्स क्रॅक केली

दिड वर्षांपासून मुलाखत पेंडीग…

Mpsc 2020

Add- मार्च 2020

प्री- मार्च क्लेअर

मेन्स- पेंडीग

      ” येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात. Confidense तळाला पोहचतो आणि self doubt वाढत जातो. दोन वर्षे झालेत पास होऊन आणि वय 24 संपत आल आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना.

कोरोना नसता सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असत. “मी घाबरलो, मी खचलो अस मुळीच नाही. मी फक्त कमी पडलोय, माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची वादळ ही कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य कॅन्टीन्यू होऊ शकेल अस काही उरलेल नाही. याला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.

मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.