Nigdi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 23) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास अजंठानगर, निगडी येथे करण्यात आली.

रवी धनाजी घोगरे (वय 22, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता सापळा लाऊन कारवाई करत रवी घोगरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.