India Corona Update : 1.07 कोटी रुग्ण कोरोनामुक्त, देशाचा रिकव्हरी रेट 97.10 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा कमी झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1.07 कोटी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.10 टक्के एवढं झाले आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 752 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 113 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 07 लाख 75 हजार 169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत देशभरात 11 हजार 718 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 21 कोटी 62 लाख 31 हजार 106 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 95 हजार 723 नमून्यांची तपासणी शनिवारी (दि.27) करण्यात आली आहे.

 

सध्याच्या घडीला देशात 1 लाख 64 हजार 511 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 051 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 01 हजार 266 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.