India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 24,354 नवे रुग्ण, 25,455 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 24 हजार 354 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 25 हजार 455 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 2 लाख 73 हजार 889 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 37 लाख 91 हजार 061 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 30 लाख 68 हजार 599 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.85 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत देशात 234 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 48 हजार 573 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 57 कोटी 19 लाख 94 हजार 990 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 29 हजार 258 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 69.33 लाख जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.