India Corona Update : देशात 4.55 लाख सक्रिय कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत 42 हजार 766 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 07 लाख 95 हजार 716 एवढी झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या 4 लाख 55 हजार 033 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असून गेल्या 24 तासांत देशभरात 45 हजार 254 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णापैकी 2 कोटी 99 लाख 33 हजार 538 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.200 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

भारतात आजवर 4 लाख 07 हजार 145 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1,206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे.
देशात आजवर 42 कोटी 90 लाख 41 हजार 970 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 55 हजार 225 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 37.21 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.